रावेर तालुक्यात कोरोनाचे संकट कायम; खेड्या-पाड्यातही वाढता आलेख !
रावेर (प्रतिनिधी)। महाराष्ट्र सह जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात रावेर तालुका सुद्धा सुटलेला नाही, रावेर तालुक्यात सुद्धा दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तालुका प्रशासनाला आतापर्यत आलेल्या अहवालांमध्ये तालुक्यात ३० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्वाधिक चोरवड ७ तर विवरा ६, रावेर शहरातील ४, आज दिवसभरात निंभोरा १३ रुग्ण बाधित आढळून आले असून तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.