भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर तालुक्यात ३५ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह !

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील तपासणी अहवाल प्राप्त झाले असून तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ३५ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. रावेर व सावदा शहरातील रुग्णांचा समावेश आहे.

तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये चिनावल ५, सावदा शहरातील ४, रावेर ५, विवरा ६, केऱ्हाळा ३, थोरगव्हान ६, निंभोरा ३, खिरोदा १, जानोरी १, वाघाडी १ अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले असून तसेच तालुक्यातील आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ही १५०० च्या जवळ येऊन पोहचली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला  आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!