भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर बोरखेडा अमानवीय हत्याकांडातील आरोपींवर जलद गतीने खटला चालवुन फासी द्यावी– वंचित बहुजन आघाडी

रावेर (प्रतिनिधी) :- रावेर येथील बोरखेडा रस्त्यालगत आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन बालकांचे हत्याकांड व त्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांवर कठोर कारवाई करत फाशी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन बालकांचे हत्याकांड व त्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यानुसार व सदर कुटुंब हे आदिवासी असल्याने आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असल्याने आदिवासी विरोधार्त केलेल्या गैरकृत्या करिता भारतीय संविधानातील अनुसूची ५ व ६ नुसार न्यायालये जलद गतीने खटला चालवून आरोपींना फासी देण्यात यावी व आदिवासी मजूर कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत सरकार मार्फत देण्यात येवून न्याय मिळवून देण्यात यावा.तसेच त्यांना ५० लाख रुपये मदत मिळाली पाहिजे.मुलाला शासकीय  नोकरीत समाविष्ठ केले पाहिजे ,घरकुल योजनेचा लाभ तत्काळ मिळावा ,१० एकर शेती मशागती करण्यासाठी कायमस्वरूपी त्यांच्या वडिलांच्या  नावे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली,

सदरचे निवेदन वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने नायब तहसीलदार एम.जे.खारे संजय गांधी रावेर व म.पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे रावेर यांना देण्यात आले वरील निवेदनावर वंचित बहिजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफ़िक़ बेग, वंचित बहिजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, कांतीलाल गाढे, सलीम शाह, बाळा शिरतुरे, रहेमान पिंजारी, रमेश सोनवणे, देवराम कोचुरे , सुरेश अटकाळे, दौलत अढांगळे, गौतम अटकाळे, किरण वाघ यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह्या आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!