भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर बोरखेडा हत्याकांड प्रकरणात बलात्काराच्या कलमांची नोंद- पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर

पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील बोरखेडा येथे चार भावंडांच्या निर्घुण हत्याकांड प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल गुन्ह्यात लैगीक अत्याचार व बालक संरक्षण कायद्या अंतर्गत वाढ करण्यात आली असून तपासासाठी ४ पथके नियुक्त करण्यात आल्याचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ.प्रतापराव दिघावकर यांनी सायंकाळी रावेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

याबाबत रविवारी सायंकाळी पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. बोरखेडा रस्त्यावर शुक्रवारी चार भावंडांची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. यावेळी दिघावकर यांनी माहिती देताना सांगितले की, गुन्हा क्र. १८८ मध्ये कलम 376 (अ) व 452 लैंगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 कलमान्वये वाढ करण्यात आली आहे. परिस्थितीजन्य पुरावे आणि मिळालेली माहिती या अनुशंगाने चार पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. ७ ते ८ संशयित ताब्यात घेतले असून संशयितांची उलट तपासणी सुरु आहे. संशयितांनी दिलेली माहिती तपासण्याचे काम सुरु असून, तपासात नवीन माहिती समोर येत आहे. तांत्रिक, वैज्ञानिक अशी विविध पथके काम करीत असून परिस्थिजन्य पुरावा आणि आलेली माहिती यावरून बलात्काराचे कलम आणि पॉक्सो अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आले आहे.

तसेच, घटनाक्रम सांगा असे विचारले असता आयजी दिघावकर यांनी, घटनाक्रम अजून समजलेला नाही असे सांगितले. यावेळी तीन दिवस झाले तरी घटनाक्रम समोर येत नसेल तर, तपास कोठे चालू आहे, या प्रश्नावर मात्र दिघावकर यांनी, विविध मुद्यांवर तपास सुरु असल्याचेच पुन्हा सांगितले.सात ते आठ संशयित ताब्यात घेतले असून त्यांची उलट तपासणी सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले तसेच तांत्रिक, वैधानिक अशी विविध पथके काम करीत असून तपासात नवीन माहिती समोर येत आहे परिस्थितीजन्य पुरावा व माहिती वरून बलात्काराचे कलम व पास्को अज्ञात व्यक्ती विरूद्ध दाखल करण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले गुन्हा अतिशय संवेदनशील असल्याने क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत असून संशयीत हे अल्पवयीन आहेत असेही त्यांनी सांगितले, पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा,उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिगळे, पोलीस निरीक्षक बापू रोहोम आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!