रावेर-यावल तालुक्यातील रस्त्यांना उतरती कडा; जनतेत संतापाची लाट..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर (प्रतिनिधी)। रावेर व यावल तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांना उतरती कळा लागल्याने हे रस्ते खड्ड्यात गेले आहेत…,ह्या रस्त्यांचा संपुर्ण प्रकार बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना माहिती असल्यावरही कुंभकर्णाच्या झोपेत आहेत की काय? असा सवाल उपस्थिती केला जात असून, कोरोनाचे संकट सांगुन टाळाटाळ केली जात असून रस्त्यांच्या कामांबाबतीत वेळ मारुन देण्याचे काम माञ प्रगतीपथावर दिसत आहे. या संबधित बांधकाम खात्याच्या अधिकारी पदाधिकारी यांना रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मुहुर्त काही सापडत नसल्याचे एकंदरीत चिञ सध्या परिस्थितीत दिसत असून रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे अजुन गुलदस्त्यात दिसत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की रावेर यावल तालुक्यातील ,लोहारा ते कुसूंबा मार्गावरील १ किलोमीटरचा रस्ता देखील शेवटची घटका मोजत आहे.तसेच जानोरी ते मोहंमांडी बोरघाट फाटापर्यंतचा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला असून खिरोदा ते कळमोदा, लोहारा ते सावखेडा, उटखेडा ते चिनावल, खिरोदा ते फैजपुर अशा अनेक रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे, तसेच शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची सुद्धा अशीच दुरावस्था आहे, तर आदिवासी गावांच्या रस्त्यांचे हाल या पेक्षाही दयनीय झाले आहेत, ह्या संबधित गावांच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन प्रवास करीत असतांना वाहन धारकांना तारेवारची कसरत करुन प्रवास करावा लागत असून हे रस्ते अपघातांना कारणीभुत ठरत आहेत. या अशा घटनांना जबाबदार कोण बेजबाबदार अधिकारी की लोकप्रतिनिधी असा सवाल उपस्थित झाला असून हा प्रकार कुठपर्यंत चालणार? या संपुर्ण रस्त्यांच्या दयनीय अवस्थांचा विचार करुन तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन संबधित रस्त्यांचे डांबरीकरण करावे अशी मागणी रावेर यावल तालुक्यातुन जोर धरू लागली आहे.