राशीभविष्य : आज शुक्रवार १९ जानेवारी २०२४. प्रतिष्ठा मिळेल,
सावधपणे मैत्री करा.प्रतिष्ठा टिकून राहील. रागावर ताबा ठेवा.किरकोळ वाद निर्माण होईल.
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शुक्रवार १९ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष :
फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येईल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल. नवे काम मिळेल.
वृषभ :
धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल. तुम्ही सावधपणे मैत्री करा. तब्येत सांभाळा.
मिथुन :
तुमची प्रतिष्ठा पणाला लावूनही मनाप्रमाणे वाटाघाटी होणे कठीण आहे. धंद्यात लक्ष द्या. रागावर ताबा ठेवा.
कर्क :
आजचे काम उद्यावर टाकू नका. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. तुमचे महत्त्व वाढेल. गैरकामे करू नका.
सिंह :
धंद्यात नवी प्रेरणा देणारी घटना घडेल. जुने मित्र भेटतील. वाटाघाटीची चर्चा सफल होईल. धंद्यात यश मिळेल.
कन्या :
जवळच्या लोकांना सांभाळून ठेवा. घरगुती प्रश्न सोडवता येईल. तुमची किंमत सर्वांना कळून येईल.
तूळ :
मनावर प्रतिष्ठेचे दडपण येऊ शकते. तुमची किंमत वाढेल. मित्राला मदत करणे जास्त महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक :
तुमच्यावर लोकांनी अधिक विश्वास ठेवावयास हवा होता असे वाटेल. प्रतिष्ठा टिकून राहील.
धनु :
घरगुती वाद होईल. प्रवासात सावध रहा. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. प्रेमाची माणसे भेटतील.
मकर :
विरोधक तुमच्या पुढे नमते धोरण घेतील. मैत्री वाढेल. धंद्यात वाढ करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ :
किरकोळ वाद निर्माण होईल. धंद्यात फायदा होईल. मुले नाराज होण्याची शक्यता आहे.
मीन :
धंद्यात धडाडीने मेहनत घ्या. फायदा होईल. चौफेर प्रगती होईल. प्रतिष्ठा मिळेल. कोर्टकेस मार्गी लागेल.