भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या जनसंवाद यात्रेस तरुणाईकडून उत्तम प्रतिसाद

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे – खेवलकर ह्यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला सर्वच गावामधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे रोहिणी खडसेंचे तरुणाईमध्ये विशेष क्रेझ निर्माण झाली आहे. बहुतांश गावागावात तरुणाईकडून सौ. खडसेंसोबत सेल्फीचा आग्रह केला जात आहे.

महिलावर्ग सुद्धा याला अपवाद नाही, असंख्य महिला आपली हक्काची समजून आपल्या समस्या मांडत आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून नाथाभाऊवर जसं प्रेम केलं तसंच निरपेक्ष प्रेम मला संवाद यात्रेतून मिळत असल्याच्या भावना रोहिणी खडसे अनेक सभामधून व्यक्त करत आहे. नाथाभाऊनी घेतलेला विकासाचा वसा मी पुढे नेण्याचा निर्धार केलाय, त्यासाठी मला बळ द्या,तुमची भक्कम साथ द्या असेही आवाहन ग्रामस्थांना करीत आहे. रविवार दि. १६ रोजी २१ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव, बेलसवाडी, कोठा, पिंप्री नांदु या गावात जाऊन रोहिणीताईनी ग्रामस्थांशी संवाद साधला.  गावा गावातील नागरिकांचा उत्साह बघता रोहिणी खडसेंची जनसंवाद यात्रा हे आपल्या हक्काचे व्यासपीठ असल्याचे जाणवत आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर  रहाणे, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान  पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील,  तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,माजी सभापती  सुधाकर पाटील,सुनिता चौधरी, प्रदिप साळुंखे,वसंतराव पाटील , किशोर चौधरी,अतुल पाटील, विकास पाटील,भागवत पाटील,भाऊराव पाटील सर,बरसात खान,बबलू मेढे,माया बारी, अमोल महाजन,सलमान भाई,बाळू चौधरी, प्रदिप पाटील,स्वप्निल पाटील,शाहिद खान, बाळाभाऊ भालशंकर,साहेबराव पाटील,सोनु पाटील, रविंद्र पाटील, विनोद काटे, भैय्या पाटील, किशोर पाटील, श्रीराम महाजन, नितीन पाटील,भुषण पाटील,चेतन राजपुत, विशाल रोटे, सारंग पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!