रिस्पेक्ट युथ फाउंडेशन तर्फे संविधान दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा संपन्न…
सावदा (प्रतिनिधी)। दि.27 संविधान दिनानिमित्त मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा रिस्पेक्ट युथ फाउंडेशन तर्फे परिसरातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच प्रत्येक भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाची माहिती असावी, या उद्देशाने भारतीय संविधानावर आधारित या स्पर्धा परिक्षेमधे आजपर्यंत शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परिक्षांमधे विचारले गेलेल्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. इ-5वी ते इ-12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा लहान गट* आणि त्यापुढील सर्व विद्यार्थ्यांचा मोठा गट असे दोन गट तयार करण्यात आले होते. यामधे लहान गटासाठी स्वतंत्र पेपर तर मोठ्या गटासाठी A ते D असे 4 सेट असलेली प्रश्नपत्रिका होती. सदर परिक्षेमधे यावल,रावेर,भुसावळ तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील 58 गावांतील 513 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि-22 नोव्हेंबर रोजी आ.गं.हायस्कूल आणि कन्या शाळा सावदा या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांचा निकाल आणि बक्षिस वितरणाचा कार्यक्रम काल 26 नोहेंबर 2020 रोजी नालंदा बुद्ध विहार सावदा येथे मान्यवारांच्या हस्ते लहान आणि मोठ्या गटातील प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रास्ताविकेची प्रत 【प्रमाणपत्र 】देवून संपन्न झाला.
यावेळी लहान गटातून
प्रथम क्रमांक-स्वप्निल अनिल सपकाळे-रा.भुसावळ (रोख रक्कम-3100 आणि प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक-रोहन कैलास तायडे-रा.हिंगोणा (रोख रक्कम-2100 आणि प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक-मोहित विनोद सोनवणे-रा.बामणोद (रोख रक्कम-1100 आणि प्रमाणपत्र)
तसेच मोठ्या गटातून
प्रथम क्रमांक-नीरज संजय सपकाळे-रा.कासवा (रोख रक्कम-3500 आणि प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक-पराग गजानन जावळे-रा.सुनोदा (रोख रक्कम-2100 आणि प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक-अमोल नितीन मेढे-रा.फैजपुर Y(रोख रक्कम-1100 आणि प्रमाणपत्र) आणि सर्व सहभागी विद्यार्थी यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक समता मंच चे रावेर अध्यक्ष-राजीव सवर्णे, सचिव-नगिनदास इंगळे, संचालक-ऍड.योगेश गजरे, adv.राजकुमार लोखंडे, कार्याध्यक्ष-उमेश गाढे, फुले-शाहू-आंबेडकर सार्वजानिक वाचनालय रावेर चे अध्यक्ष-राजेंद्र अटकाळे, फैजपुर न.पा. चे नगरसेवक-इरफ़ान मेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था-रावेर चे संजय भालेराव सर, चिनावल तलाठी-उमेश बाभुळकर(से.नि.आर्मी) आदी मान्यवर उपस्थित होते.