रोझोदा येथे एका रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित !
रोझोदा ता.रावेर(प्रतिनिधी) । तालुक्यातील आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात गावांतील एका व्यक्तींचा अहवाल बाधित आढळून आला आहे. प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे
आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात रोझोदा येथील ६७ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. सदरील रुग्ण बस स्टँड एरिया पाण्याच्या टाकी जवळील परिसरातील रहिवासी असून रुग्ण राहत असलेल्या परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला असून संपर्कातील व्यक्तीना कॉरटाइन करण्यात आले आहे, सदरील वृत्ताने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.