भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

लॉकडाऊन काळात दुकान उघडल्याने पोलिसांच्या मारहाणीत सलून मालकाचा मृत्यू- नातेवाईकांचा आरोप

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

औरंगाबाद (वृत्तसेवा):- लॉकडाऊन काळात सलूनची दुकान उघडली म्हणून कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने सलून मालकाला मारहाण केली. या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. फिरोज खान कदिर खान वय ४०, रा. उस्मानपुरा असे मयताचे नाव आहे. हि घटना बुधवारी दुपारी उस्मानपुरा भागात घडली. संतप्त नातेवाईकांनी सलून मालकाचा मृतदेह उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेत ठिय्या मांडला. यावेळी शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता. या प्रकरणात पोलिस निरीक्षक दिलीप तारे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलीस शिपाई संदिपान धरमे यांची तडका फडकी मुख्यालयात बदली केली.

पीरबाजार उस्मानपुरा येथे फिरोज खान यांचे एस एस सलून आहे. बुधवारी सलून मध्ये त्यांचे कामगार ग्राहकांची कटिंग करत होते. याच दरम्यान उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ आणि शिपाई संदीपान धरमे हे सलून वर कारवाईसाठी गेले. तिथे मालक नसल्यामुळे कामगारांना मालकाला बोलविण्यास सांगितले. त्यानंतर तिथे फिरोज खान आले, दंडाच्या रकमेवरून त्यांच्यात वाद झाला. संतप्त पोलिसांनी फिरोज खान यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर त्यांनी मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्यांत नेत तिथेच ठिय्या मांडला. हळूहळू पोलीस ठाण्याच्या समोर शेकडोचा जमाव जमला. दोनच्या सुमारास पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ खासदार इम्तियाज जलील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कदिर मौलाना हे देखील आले. नातेवाईक आणि पोलीस आयुक्त यांच्यात बोलणी झाली. यात त्यांनी उपनिरीक्षक आणि शिपाई यांची बदली, तपासासाठी चांगला अधिकारी द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यावर पोलीस आयुक्तांनी तत्काळ त्यांची बदली मुख्यालयात केली. आणि या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांची देखील मुख्यालयात बदली करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यांनी सांगितले. दरम्यान या आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दि चेन मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासनाने अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकानेबंद ठेवण्याचे आदेश दिले त्यात सलून दुकान ही बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. दुकान बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे बिकट संकट निर्माण झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील एका सलुन व्यावसायिकाने आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून दुकान बंद झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!