विजेच्या लपंडावांत डॉ.कुंदन फेगडे यांची आक्रमक उडी; माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार,इतर नगरसेवकांची चुप्पी !
यावल,प्रतिनिधी(सुरेश पाटील):
संपूर्ण यावल शहरात वीजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असल्याने तसेच वीज वितरण कंपनी यावल येथील उपकार्यकारी अभियंता वीज पुरवठा सुरळीत करणेकामी निष्क्रिय ठरत असल्याने यावल नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी यावल करांच्या संतप्त भावना लक्षात घेता तसेच ऑनलाइन वृत्ताची दखल घेऊन आज दिनांक 8 रोजी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग यावल यांना लेखी निवेदन देऊन वीज पुरवठा तात्काळ नियमित आणि सुरळीत करणेबाबत निवेदन दिले तसेच पुढील कार्यवाहीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे. गेल्या पंधरा वीस दिवसापासून यावल शहरात दिवसा व रात्री अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण यावलकर संतप्त झाले होते आणि आहे याबाबत काल दिनांक 7 ऑनलाइन वृत्त संपूर्ण यावल शहरात विजेचा लपंडाव सुरूच ग्राहकांमध्ये संतप्त भावना वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष असे प्रसिद्ध झाले त्याची तात्काळ दखल घेत यावल येथील स्वीकृत नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी आज दिनांक 8 बुधवार रोजी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग यावल यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले
आहे की,
गेल्या १५ दिवसांपासून यावल शहरात वीजपुरवठा दिवसा आणि रात्री शेकडो वेळेत खंडित होत असतो आणि व्होलटेज चढ उतार होत असले तरी याबाबतीत यावल शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड
रोष असून जमावबंदी जर नसती तर नक्कीच अनेक मोर्चे यावल शहरात निघाले असते.जनतेच्या तीव्र
भावना लक्षात घेता आपण यावर त्वरित तोडगा काढावा आणि आपल्या समोर फारच मोठा प्रश्न
असल्यास आपण पत्रकार परिषद घेऊन यावल शहरातील जनतेला धीर देण्याचा प्रयन्त करावा.
एकतर या महिन्यात नागरिकांना अवाच्या सव्वा लाईट बिले आलेले आहेत ज्यांच्या घरात एक
ट्यूब आणि एक पंखा आहे त्यांना सुद्धा दोन – दोन हजार रुपये लाईट बिले आली आहेत लॉक डाऊन मुळे रोजगार नाहीत लोकांचा खाण्यापिण्याचे वांधे आहेत त्यात लाईट नाही आणि वस्न लाईट बिलांचा मारा यामुळे जनता त्रस्त झाली असून लवकरच उपाय योजना कराव्यात नाही तर आपल्याला जनतेच्या
रोषाला सामोरे जावे लागेल याची आपण तयारी ठेवावी.
एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या कार्यक्षमतेवर जर प्रश्न उपस्थित होत असतील तर आम्हाला सुद्धा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार याची आपण गंभीर दखल घेऊन जनतेला जाहीर खुलासा करून उत्तर द्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने पुढील कार्यवाही करावी लागेल असे दिलेल्या निवेदनात
डॉ कुंदन सुधाकर फेगडे यांनी नमूद केले आहे तरी म.रा.वि.वि. कंपनी उपविभाग यावल येथील उपकार्यकारी अभियंता यावल शहरातील वीज पुरवठा सुरळीत करणेकामी काय काय कारवाई करतात ? तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केल्याने तेसुद्धा काय कारवाई करतात याकडे संपूर्ण यावलकरांचे लक्ष वेधून आहे.
यावल शहरात विजेचा लपंडाव सतत होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने यावल शहरातील आजी-माजी काही नगरसेवकांची व इतर काही संघटना पदाधिकारी कार्यकर्ते गप्प बसून असल्याने यावल करांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.