विस्फोट ; एकाच दिवसात आढळले ४ लाखा पेक्षा जास्त रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. दिवसा गणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरदिवशी कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठत असल्याने ही बाब भारताला चिंता करायला लावणारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत असून ही चिंता करण्याची गरज आहे,
देशात मागील 24 तासांत दोन लाख 99 हजार 988 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या एक कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची दररोजची संख्या पाहता पुढील तीन दिवसांत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे जाऊ शकते,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली,तसेच त्यांनी अशीही माहिती दिली की,देशात आतापर्यंत दोन लाख 11 हजार 853 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक कोटी 56 लाख 84 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 32 लाख 68 हजार 710 रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतींसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्यांहून अधिक आहे, अशा दीडशे जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात