शेळगाव बॅरेजचे हरीसागर नामकरण करण्याची मागणी; माजी खासदार, माजी आमदार जावळे एक राजकीय संत होते.
यावल(प्रतिनिधी)दि.6:
भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभा व रावेर विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय खरे जनसेवक आणि राजकीय संत तथा माजी खासदार माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे सर्व स्तरातील कामाचा आढावा लक्षात घेता शेळगाव बॅरेजचे हरीसागर नामकरण करण्यात यावे अशी मागणी यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे आज दिनांक 6 जुलै 2020 सोमवार रोजी करण्यात आली. जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील, तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जनसेवक स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे दिनांक 16 जून 2020 रोजी दुःखद निधन झाले. माजी खासदार माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे सामाजिक आणि आणि राजकीय योगदान अत्यंत महत्वपूर्ण बहुमोलाचे ठरले होते आणि आहे, आपल्या राजकीय कारकिर्दीत दोन वेळा खासदार तसेच दोन वेळेस आमदार राहिलेल्या स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी जनसेवेचा घेतलेला वसा आजन्म जोपासला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी वेळोवेळी लोकसभा तसेच विधानसभा सभागृहात अभ्यासपूर्ण विवेचन करून आवाज उठविला खास करून केळी या शेतीमालासाठी तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेहमीच संघर्षाची भूमिका ठेवली. मेघा रिचार्ज प्रकल्प, सिंचनाचे प्रश्न, सूक्ष्म सिंचन माती-पाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकीय व पक्षीय भूमिका बाजूला सारून त्यांनी कोणत्याही प्रकारचे भेदभावाचे राजकारण न करता त्यांनी एका तपस्वया प्रमाणे जीवन सार्वजनिक कार्यासाठी वेचले त्यातूनच त्यांची राष्ट्रीय संत अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झालेली होती आणि आहे व ती कायम तशीच राहणार यात शंका नाही. त्यांच्या कार्याचा लाभ तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या झाला यात कुणाचेही दुमत नाही. अशा तपस्वी राजकीय संताच्या स्मृतीची आठवण जनमाणसात कायम रहावी व त्यांच्या कार्याचा आदर्श या पुढे अनेकांना मार्गदर्शक ठरावा म्हणून यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन करतो कि स्व. हरिभाऊ जावळे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पाठपुरावा करून निधी मंजूर करून पूर्णत्वाकडे आणलेल्या शेळगाव बॅरेजच्या होणाऱ्या जलसाठ्यास हरीसागर असे नामकरण करण्यात यावे.
तसेच शेळगांव बॅरेज बॅक वॉटर वरील भुसावल ते अंजाळे तालुका यावल येथील पुलाचे स्वर्गीय हरिभाऊ जावळे उड्डाणपूल असे नामकरण करण्यात यावे. शेळगाव बॅरेज लगतची यावल तालुका हद्दीमधील ( वाघळूद हद्दीतील ) सरकारी जमीन तसेच आवश्यक तो निधी स्वर्गीय हरिभाऊ जावळे स्मृतिउद्यान व स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी करण्यात आली असून दिलेल्या निवेदनावर यावल तालुका भा.ज.पा. अध्यक्ष उमेश फेगडे, भा.ज.यु. जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे,शहराध्यक्ष निलेश गड़े, कृ.ऊ.बा.स. उपसभापती उमेश पाटील, भ.ज.यु.मो. यावल शहराध्यक्ष रितेश बारी यांनी
केली आहे.