भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगावराजकीय

श्रीक्षेत्र ऋषीपांथा येथे आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी सामुहिक मुंडण करत महाविकास आघाडीचे घातले श्राद्ध…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

चाळीसगाव (शुभम देशमुख): चाळीसगाव तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना १२ दिवस जेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी श्रीक्षेत्र ऋषीपांथा बहाळ येथे सामुहिक मुंडन करून शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घातले.

यावेळी भटजी बुवांच्या हस्ते तीन पाय असलेल्या खुर्चीवर तिघाडी सरकार – भावपूर्ण श्रद्धांजली नाव असलेला फोटोची विधिवत पूजन करत महाविकास आघाडीचे श्राद्ध देखील घालण्यात आले. शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार हाय – हाय, तिघाडी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सदर मुंडन आंदोलन प्रसंगी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी कृउबा सभापती सरदारसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, पियुष साळुंखे, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नगरसेवक बापू अहिरे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल यांच्यासह आंदोलक शेतकरी व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंडण आंदोलन स्थळी जात असताना रस्त्यात खरजई, तरवाडे, न्हावे – ढोमणे, बहाळ येथील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांचा ताफा अडवत त्यांचा सत्कार केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!