संकट कायम ! जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा ५९५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५९५ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि अमळनेर तालुक्यात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १४४ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ७७ रूग्ण हे अमळनेर आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर ७, जळगाव ग्रामीण २१ , जामनेर ३५, पारोळा ५३, पाचोरा २७; भुसावळ ७, अमळनेर ७, चोपडा २५, भडगाव ६, धरणगाव ४०, यावल ६, एरंडोल ६५, चाळीसगाव ३०, मुक्ताईनगर ४१, बोदवड २, अन्य जिल्हा ९ असे रूग्ण आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १७१३१ इतका झालेला आहे. यातील ११७२८ रूग्ण बरे झाले आहेत. आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६४७ इतकी तर उपचार घेत असलेले ४७५६ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.