संतापजनक; मतिमंद तरुणीवर बलात्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बोदवड (प्रतिनिधी)। बोदवड तालुक्यातील एका गावात मतीमंद तरूणीवर गावातीलच तरूणाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय तरूणी ही मतीमंद असल्याने तिच्या वडीलांनी तिला घराच्या बाहेर ओट्यावरील खाटेला दोरीने बांधले होते. २६ डिसेंबर रोजी दुपारी घरात कोणीही नसल्याचे पाहून गावातील संशयित आरोपी राजू सुकदेव वाघ याने वेडसरपणाचा गैर फायदा घेवून तरूणीवर बलात्कार केला. हा प्रकार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पिडीत तरूणीच्या आईवडीलांना समजला असता त्यांनी बोदवड पोलीसाना ही हकीकत सांगितली. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजू वाघ यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.