सट्टापेढीवर पोलिसांची धाड; एकाला अटक
जळगाव प्रतिनिधी । येथील हरिविठ्ठलनगरातील तडवी वाडा येथे सट्टापेढीवर रामानंदनगर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत रोख रकमेसह सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा- फैजपुरात मटका (सट्टा) व्यवसाय जोमात; पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह…..!
शहरातील हरिविठ्ठल नगरातील तडवी वाडा येथील पार्टीशनच्या खोलीत एक जण सट्टाचे आकडे घेत सट्टा जुगार खेळवित असल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळालेल्या माहितीनुसार यांच्या पथकाने विनोद सोनवणे, चंदु पाटील, शिवाजी धुमाळ, होमगार्ड आकाश सपकाळे, अनिल पिंजारी यांचे पथक तयार केले. या पथकाने सट्टापेढीवर धाड टाकली असता, याठिकाणी सट्टयाचे आकडे घेणारा शब्बीर लालु पिंजारी (वय-५८ )रा. हरिविठ्ठलनगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ७१० रुपये रोख रकमेसह सट्टाचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या हस्तगत करण्यात आल्या असून त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.