लग्न समारंभाला उपस्थिती संदर्भात; सरकारचा मोठा निर्णय !
मुंबई (प्रतिनिधी)।
राज्यात सध्या करोनाचे संकट असताना घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मे आणि एप्रिल महिन्यामध्ये अनेकांना ठरलेल्या लग्नाच्या तारखा पुढे धकलाव्या लागल्या होत्या. मात्र आता करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्यादृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आली आहे.
माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टन्सिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्यांचा विचार करून सरकारने या बाबतचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
नागरिकांची मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे, खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.