सरकारी दप्तर बेकायदा जवळ ठेवले प्रकरणी ८ ग्रामसेवकांवर कारवाई; मोठी कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव(प्रतिनिधी)। चाळीसगाव, बोदवड, धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सरकारी दप्तर बेकायदा ताब्यात ठेवल्याने याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ८ ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली असून पाच ग्रामसेवकांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याने ग्रामसेवकात खडबड मजली आहे,
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी ५ वाजता काढले असून ५ ग्रामर्सेवकांना जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे. तसेच इतर दोन ग्रामसेवक कर्तव्यात गैरहजर आढळून आले असून त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारवाई केलेल्यामध्ये जिल्ह्यातील एकूण ८ ग्रामसेवक असे ,राहुल नारायण पाटील (चिंचखेडा सिम बोदवड जि.जळगाव), सुभाष रामलाल कुंभरे ,ग्रामसेवक (धौडखेडा ता.बोदवड जि . जळगाव), सुरेश दत्तात्रय राजहंस ग्रामसेवक ग्रामपंचायत (वरखेडता. बोदवड जि. जळगाव), गणेश रामसिंग चव्हाण ग्रामसेवक ग्रामपंचायत (जुनोने दिगर ता. बोदवड जि. जळगाव), राहुल नारायण पाटील, ग्रामसेवक (ग्रामपंचायत आमदगाव, ता. बोदवड जि. जळगाव), नंदलाल किसन येशीराया ग्रामसेवक ग्रामपंचायत (लोंजे ता. चाळीसगाव जि. जळगाव) आदी यांच्यावर कारवाई केली आहे. जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास शेंडे व पीएसआय प्रदीप चांदेलकर, पो.काँ. योगेश ठाकुर, नरेंद्र दिवेकर, होमगार्ड मधुकर मोरे, स्वप्निल सपके,प्रशांत शिंपी या पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ८ ग्रामसेवकांवर कारवाई झाल्याचा महाराष्ट्रातील पहिलाच खटला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ८ पैकी कर्तव्यावर गैरहजर असलेले विनायक चुडामण पाटील, ग्रामसेवक ग्रामपंचायत (झुरखेडा ता. धरणगाव जि. जळगाव), अनिल कचरू जावळे ग्रामसेवक ग्रामपंचायत (डोणगाव ता. धरणगाव जि. जळगाव) हे दिसून आले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .