भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

सर्दी, खोकला, फ्लू , तापाची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकल्यास कायदेशीर कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असून या पार्श्वभूमीवर सर्दी , खोकला, फ्लू , तापाची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीऔषधी दुकानदारांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, जिल्ह्यामध्ये बरेच रुग्ण कोरोना संसर्गाच्या अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याचे आढळून आले आहे . सर्दी , खोकला, फ्लू , तापाची लक्षणे या रुग्णांना आढळून येतात . रुग्णांनी त्याअथीच्या औषधांची मागणी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये आणि औषध दुकानदारांनीही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे लोकांना देऊ नये. औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्यास रुग्ण मूळ आजाराच्या उपचारांपासून वंचित राहू शकतो . त्यामुळे औषधी दुकानदारांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे . औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देणाऱ्या औषधी दुकानदारांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!