सावदाशहरात पुन्हा वाढतोय कोरोनाचा प्रभाव आज आणखी 1 रुग्ण बाधित; 3 अहवाल निगेटिव्ह !
सावदा ता. रावेर (प्रतिनिधी)। आज आलेल्या कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असुन कोरोना बधित रुग्णांच्या संख्येत 1 रुग्णांची भर पडली असुन सदरील रुग्ण रविवार पेठ परिसरातील 56 वर्षीय पुरुष आहे. काही दिवसांपूर्वी यांच्याज घरातील वृध्द व्यक्ती बाधित आढळून आला होता व आज पुन्हा एक बाधित आढळल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सदरील घटनेने सावदा रविवार पेठ,जगमाता परिसरातील बधितांची संख्या 3 झाली आहे. मागील 4-5 दिवसांपासून शहरात 4 रुग्ण बाधित आढळून आले असुन पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता नागरिकांना आणखी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. तरी रुग्णांचा रहिवास असलेला परिसर प्रशासनाकडून आधिच सिल असुन सदरील घटनेने परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत टाकले असून कॉरंटाइन असलेले 3 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 39 झाली असुन त्यात 6 मयत, 4 उपचार घेत आहे व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.