सावदा उपनगराध्यक्ष पदी विश्वास चौधरी…? बिनविरोध निवड होण्याचे संकेत !
सावदा ता.रावेर (विशेष प्रतिनिधी)। येथील नगरपालिका उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज सोमवार रोजी पार पडणार आहे. यासाठी नगर पालिकेच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले असून विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सत्ताधारी भाजपा गटाकडून सर्व भाजपा नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला असल्याचे खात्री लायक वृत्त असुन मिळालेल्या माहिती नुसार सावदा पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी विद्यमान नगरसेवक विश्वास तुकाराम चौधरी यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.
विद्यमान उपनगराध्यक्ष शबाना मुराद तडवी यांनी ६ जुलै रोजी आपला राजीनामा नगराध्यक्षांकडे सुपूर्त केला होता, त्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी ही निवड आज दि १३ रोजी नगरपालिका सभागृहात दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन केले असून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या कडे नाम निर्देशन पत्र सादर करावयाचें असुन या विशेष सभेचे पिठासन अधिकारी रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे या असतील दरम्यान याबाबत विरोधी गटात सध्याच्या घडीला कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने आज होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडीत विरोधकांकडून उमेदवारी देण्याची शक्यता फार कमी असल्याने सदरील निवड बिनविरोध होण्याचे मानले जात असुन या निवडीकडे संपुर्ण सावदा वासीयांचे लक्ष लागुन आहे.
Pingback: सावदा उपनगराध्यक्ष पदी विश्वास चौधरी यांची बिनविरोध निवड, मंडे टू मंडे चे भाकीत खरे ठरले ! »