सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात अडवणूक, ग्राहकांची आर्थिक लुट,,,,,,,,,,!
सावदा. ता.रावेर (विशेष प्रतिनिधी)। येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बे-भाव ग्राहकांची आर्थिकलुट करण्यात येत असून येथील तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत , शेतकऱ्यांसह इतर नागरिक या ठिकाणी शेती, घर, प्लाट ,आदी खरेदी- विक्री करीता तसेच नजरगहाण,बक्षीस पत्र, हक्कसोडपत्र,बोजा बसवणे ,कमी करणे या करिता येत असतात.
सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे जलगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त महसूल उत्पन्न देणारे एकमेव कार्यालय आहे, या कार्यालयाला रावेर-यावल तालुक्यातील दोन मोठी शहरे व किमान शंभर च्यावर गावे लागूं असल्याने या कार्यालयात दररोज किमान पस्तीस-चाळीस खरेदी-विक्री व्यवहार होत असतात, या व्यवहाराच्या माध्यमातून या पासुन शासनाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळत असतो, सतत च्या होणाऱ्या अतिवृष्टी मुळे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत नाही, तर नापिकी मुळेही शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे,तसेच सद्या कोरोना मूळे व्यवहाराची मंदी असल्याने आर्थिक चालना मिळावी या साठी महाराष्ट्र सरकारने महसूल उत्पन्नात मोठी घट केली आहे ग्रामीण भागासाठी तीन टक्के व शहरी भागासाठी चार टक्के मुद्रांक शुल्क कमी केलेले आहे परंतु संबधित दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकऱ्यांची अडवणूक करून प्रत्येक दस्ताला दलाल किंवा वेंडर यांच्या मार्फत पैशांची मागणी केली जाते.
विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली तर कधी निसर्गाची अवकृपा या मुळे पैशांची गरज भासल्याने शेतकऱ्यांना आपली शेती, कोणाला प्लाट,तर कोणाला घर विकावे लागते या वेळी सदर कार्यालयात संबधीतांकडून, मुद्दामहून कागदपत्रांमध्ये ,हा कागद हवा, तो कागद हवा, अश्या वेगवेगळ्या ” क्यूऱ्या “ काढून दलालांमार्फत रकमेची मागणी केली जात असल्याचे परिसरात बोलले जाते. तसेच अधिक चौकशी केली असता खरेदी विक्री व्यवहाराच्या वेळी ” सा,शी ” च्या नावाने रुपयांची मागणी केली जात असून ग्राहकांची आर्थिक लूट केली जाते,असेही ग्राहकाकडून सांगितले जाते, प्रत्येक खरेदी व्यवहारा मागे व्यवहाराच्या रकमे नुसार ‘ सा,शी ‘ नावाने जी रक्कम मागितली जाते ही रक्कम पाचशे रुपयांपासून ते पाच हजारापर्यंत असते,असेही सांगितले जाते, सा-शी बाबत अधिक चौकशी केली असता ‘सा–शी’ म्हणजे ‘साहेब–शिपाई’ असे सांगितले गेले या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या क्यूऱ्या काढून व इतर मार्गातून सुमारे असे ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत रोजची कमाई होत असून कधीकधी या पेक्षाही जास्त दररोज होत असल्याचे सांगितले जाते त्या नुसार दर महा ९ ते १० लाख रुपयांची कमाई अवैध मार्गाने संबधित खुर्चीची होत असल्याचे बोलले जाते,या ठिकाणी अनेक कामे ही दलालां मार्फत केली जात असल्याने काही कामे ही ” लेन-देन “ शिवाय होत नसल्याचेही बोलले जाते, ‘ लेन देन ‘ झाली म्हणजे कोणता कागद नसला तरी चालतो,अशीही चर्चा ऐकायला मिळते. ,,, तूर्त एव्हढेच ,,,,,?