सावदा पालिके कडून कोरोना तपासणी शिबीर; मात्र शिबिराकडे आरोग्यविभागाचे दुर्लक्ष !
सावदा (प्रतिनिधी)। शहरात मागील ३ दिवसांपासून नगरपालिके अंतर्गत सावदा शहरातील नगरपालिका संचालित कन्या शाळेमध्ये शहरातील व्यापारी जसे की, सर्व भाजी विक्रेते, दुकानदार यांच्या साठी कोविड-१९ टेस्टसाठी (Corona testing) कॅम्प घेण्यात येत आहे.
आज कॅम्प साठी लोकांनी गर्दी केली होती परंतु अचानक कळले की स्वाब सँपल घेण्या साठी आरोग्य यंत्रणेचे कुणीही उपलब्ध झाले नाही. असे असताना सावदा नगरपालिकेतील कर्मचारी धीरज बनसोडे (Mynet computer system coordinator) व विनय खक्के (PMAY अभियंता) यांनी पुढे होऊन स्वतः टेस्टिंग सुरू केली. एकूण १०५ जणांची टेस्ट त्यांनी यशस्वी रित्या केली. त्यासाठी त्यांचे कौतुक व अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. या कॅम्पला यशस्वी होण्याकरिता नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, सचिन चोळके, विमलेश जैन, किरण चौधरी, अरुण ठोसरे, राजेंद्र मोरे, आकाश तायडे, जगदीश लोखंडे यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य होते.