सावदा येथील आ.गं. हायस्कुल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेत उतुंग भरारी !
सावदा ता.रावेर(प्रतिनिधी)। बारावी परिक्षेत श्री आ.गं हायस्कुल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९३.३६ टक्के लागला असून विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा ८८.२५ टक्के निकाल लागला आहे.
सावदा नगरपालिका संचालित श्री आ.गं हायस्कुल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. यात विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. निकालानुसार आकांक्षा रविंद्र महाजन इने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. तर कला शाखेतून कुणाल रविंद्र कोळी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालांत परिक्षेचा विद्यालयाचा दोन्ही शाखांचा निकाल चांगला लागला आहे.
शाखानिहाय निकाल याप्रमाणे–
विज्ञान शाखा – प्रथम आकांशा रविंद्र महाजन ८५.२३ टक्के, द्वितीय मयुर कन्हैया पाटील ८४ टक्के तर कला शाखा- प्रथम कुणाल रविंद्र कोळी ७८ टक्के, दुसरा तिलोत्तमा धनराज शिंदे ७४.९२ टक्के, असे गुण मिळवून यश संपादन केले आहे.
सर्व शालांत परिक्षेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन सावदा नगरीच्या नगराध्यक्षा सौ.अनिता येवले, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, शिक्षण समिती सभापती करूणा पाटील, महिला व बाल कल्याण सभापती रंजना भारंबे, सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, गटनेते अजय भारंबे, विरोधी गटनेते फिरोजखान हबीबुल्ला खान पठाण, नगरसेवक राजेश वानखेडे , राजेंद्र चौधरी तसेच सर्व आजी – माजी नगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका यांनी त्यांचे मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. प्राचार्य सी. सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंदन केले आहे.