सावदा येथे घराचे कुलुप उघडून डॉक्टर दांपत्याचे घरातून सोने व रोख रकमेसह ७० हजारांची चोरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधी)। सावदा येथील डॉक्टर दांपत्याचे घराचे कुलुप उघडून कपाटतील सोने व रोख रक्कम सह ७० हजार रूपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील पंजाब नेशनल बैक मागे राहणारे डॉक्टर चेतन कोळंबे व त्यांचे पत्नी हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गावी गेले होते, याच दरम्यान दी 26 जानेवारी चे सकाळी 6 ते दी 27 चे रात्री 11 वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयानी घराचे समोरिल दाराचे कुलुप काश्याचे तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला व बेडरूम चे दरावाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करून गोदरेज कपाटाचे कुलुप तोडले व आत ठेवलेले 30 हजार रुपये रोख तसेच 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले.
सदर बाब डॉक्टर दाम्पत्य बाहेर गावाहुन परत आल्यावर उघड़किस आली,या नंतर पोलिसांना पाचरण करण्यात आले, पोलिसांनी पंचनामा केला श्वान पथकास पाचरण केले असता त्याने घरातच घुटमळला, सदर ठिकाणी फिंगर प्रिंट देखील घेण्यात आले असून या प्रकरणी डॉ चेतन कोळंबे यांचे फिर्यादी वरुन अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स,पो,नी, देवीदास इंगोले यांचे मार्गदर्शना खाली पो,हे, कॉ, महेमुद शहा, वसीम पठाण, सुरेश अठाईगे, व सहकारी करीत आहे