भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावदा येथे तपासणी शिबिरातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एका डॉक्टरांचा समावेश !

सावदा (प्रतिनिधी)। शहरात नगरपालिका प्रशासना अंतर्गत कोरोना विषाणू तपासणी शिबार घेण्यात येत असून आज एकूण ४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात ८ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये ६ बाधित अहवाल सावदा शहरातील आहेत.

मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात घेण्यात आलेल्या कोविड-१९ साठी तपासणी शिबिरात मध्ये एकूण ४२ जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये ८ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात ६ बाधित रुग्ण सावदा शहरातील असून यामध्ये एक स्वामींनारायण नगरमधे हॉस्पिटल असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉक्टरचा समावेश असल्याचे वृत्त आहे, तर २ बाधित रुग्ण बाहेर गावातील आहेत सदरील शिबिर सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असून तसेच सचिन चोळके, संदीप पाटील, विमलेश जैन, आकाश तायडे, अरुण ठोसर, किरण चौधरी, विनय खक्के, धिरज बनसोडे, राजेंद्र मोरे यांचे शिबीर यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न आहेत.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या १२५ झाली असुन त्यात १० मयत, १० उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!