सावदा येथे तपासणी शिबिरात १३ जण पॉझिटिव्ह;सावद्यातील ८ जणांचा समावेश !
सावदा (प्रतिनिधी)। शहरात नगरपालिका प्रशासना अंतर्गत कोरोना विषाणू तपासणी शिबार घेण्यात येत असून आज एकूण ३२ जणांची तपासणी करण्यात आली त्यात १३ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये ८ जण सावदा शहरातील आहेत.
मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात घेण्यात आलेल्या कोविड-१९ साठी तपासणी शिबिरात मध्ये एकूण ३२ जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये १३ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधित आलेल्या मध्ये ९ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे यामध्ये सावदा शहरातील ८ जणांचा समावेश आहे, तसेच मस्कावद ३, खिर्डी १, दसनुर १ अशे रुग्ण बाधित आढळले आहे, सदरील शिबिर सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे तसेच सचिन चोळके, संदीप पाटील, विमलेश जैन, आकाश तायडे, अरुण ठोसर, किरण चौधरी, विनय खक्के, धिरज बनसोडे, राजेंद्र मोरे यांचे शिबीर यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न आहेत.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या १५६ झाली असुन त्यात १० मयत, १५ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.