भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावदा येथे रहिवास असलेल्या निंभोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह तीन व खिर्डीतील १ अहवाल कोरोना बाधित !

निंभोरा (प्रतिनिधी)। निंभोरा येथे सुरवातीला कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता, मध्यंतरी गावांतील संक्रमणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचे दिसून आले होते परंतु आज निंभोरा सेंटरला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये गावातील पुन्हा ३  व खिर्डी येथील १ अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या गावांतील कोरोना तपासणी अहवालात निंभोरा गावांतील ३ अहवाल त्यात सावदा शहरातील राहिवासाला असलेल्या व निंभोरा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा (कोरोना योध्याचा) समावेश असून आणखी एक पुरुष व एक महिला अशे तीन अहवाल निंभोरा येथील बाधित आले असून तसेच खिर्डी गावांतील एका महिलेचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने परिसरातील चिंतेत वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याचे दिसत असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. निंभोरा येथील बाधित रुग्ण संख्या ४० झाली असून त्यात ३ जण उपचार घेत आहेत, सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांच्या कडुन दुजोरा मिळाला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!