सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर नाशिकच्या पथकाची धाड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
धरणगाव (प्रतिनिधी)। तालुक्यातील पाळधी गावापासून जवळच असलेल्या सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने रात्री छापा टाकला असून जळगावातील काही राजकीय मंडळींना ताब्यात घेण्यात आल्याचे समजत आहे.
मिळालेले वृत्त असे की, विशेष पोलीस महानिरिक्षकांना सावदा-रिंगणगाव रस्त्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनुसार नाशिकचे परिविक्षाधीन डीवायएसपी गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला आहे. या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली असून यात जळगावातील काही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती समजत आहे. यातील संशयितांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.