सावदा शहरात “कही खुशी कही गम ” ; बँक कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण !
सावदा (प्रतिनिधी)। शहरातील परिस्थिती “कही खुशी कही गम ” असल्याचे दिसून येत आहे, काल रात्री संशयित व्यक्तींचे तपासणी अहवालात निगेटिव्ह आले होते, तो दिलासा मिळतोय तोवर शहरात आणखी एका रुग्णास कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरातील काही दिवसांपूर्वी घेण्यात असलेल्या तापणसी अहवाला मध्ये ९ अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळतोय तोवर शहरात एक ३५ वर्षीय बॅक कर्मचारी बाधित आढळून आल्याने शहरातील एकंदरीत परिस्थिती ही “कही खुशी कही गम” अशी असल्याचे दिसते, मध्यंतरीच्या काळा पेक्षा आज तरी कोरोनाचा वेग शहरात कमी झाल्याचे दिसून येत आहे. सदरील रुग्ण स्वामीनारायण नगर मधील रहिवासी असून परिसर सील करण्यात येत आहे. शहरातील एकूण बाधित संख्या ६२ इतकी झाली आहे, सदरील वृत्तास नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.