सावद्यात एका कपडा दुकानदारांस कोरोनाची बाधा !
सावदा (प्रतिनिधी)। शहरातील आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात शहरातील एका व्यक्तीच्या तपासणी अहवाल बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले आहे.
शहरातील आलेल्या अहवालांमध्ये एका ४४ वर्षीय पुरुषांचा अहवाल बाधित आढळून आला आहे. सदरील रुग्ण कपडा दुकानदार असून बस स्थानकामागील अमोल नगर येथील रहिवासी आहे. सदरील परिसर प्रशासनाकडून सील करण्याची प्रकिया सुरू आहे.वृत्ताने परिसराची चिंता वाढली असून खबरदारी म्हणुन संपर्कातील व्यक्तींना प्रशासनाकडून कॉरटाईन करण्यात येत असून परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे. सदरील वृत्तास नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ६२ झाली असुन त्यात ९ मयत तर २ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.