सावदा पुन्हा कोरोनाच्या कचाट्यात; ९ अहवाल कोरोना बाधित!
सावदा (प्रतिनिधी)। शहरातील काल रात्री उशिरा आलेल्या बाधित रुग्णांना संपर्कातील व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून पुन्हा शहरातील ९ व्यक्तीचे तपासणी अहवाल बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले आहे.
शहरातील आज आलेल्या अहवालांमध्ये ९ अहवाल बाधित आहळून आले आहेत त्यात ४ महिला ३३वर्षीय, ६५ वर्षीय ३६ वर्षीय१४ वर्षीय व ५ पुरुष दोन १० वर्षीय, १४ वर्षीय, ३८ वर्षीय ४२ वर्षीय अशे अहवाल बाधित आढळून आले आहे. किमयागार हॉस्पिटल जवळील, प्लॉट एरिया परिसरातील रहिवासी आहे. सदरील परिसर प्रशासनाकडून सकाळीच सील करण्यात आला असुन सदरील वृत्तास नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ७२ झाली असुन त्यात ९ मयत तर १२ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.