भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख; ८वीच्या पुस्तकात गंभीर चूक !

मुंबई (वृत्तसंस्था)।आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकात ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा यदुनाथ थत्ते धडा आहे. या धड्यामध्ये एक व्यक्ती शाळकरी मुलांना देशप्रेमाबद्दल सांगत आहे. या एका व्यक्ती आणि शाळकरी विद्यार्थ्यांमधील संवाद धड्यात देण्यात आला आहे. यादरम्यान एक विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नात ही घोडचूक करण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला आहे की, ‘भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते.’ इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात शिक्षण मंडळाने घोडचूक केली आहे. या पुस्तकामध्ये भगतसिंह, राजगुरु या क्रांतिकारांसोबत फाशी गेलेल्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव सुखदेव यांच्या ऐवजी कुर्बान हुसेन नाव छापण्यात आले आहे. या पुस्तकात ही अक्षम्य चूक करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी निदर्शनास आणले आहे. सुखदेव यांचाच नव्हे तर हा क्रांतिकारकांचा अपमान असल्याचा संताप ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता चुकीचा मजकूर छापलेली सर्व पुस्तके मागे घ्यावीत. तसेच संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी आता ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून आठवीच्या पुस्तकात ही चूक झाली आहे. यापूर्वी सुद्धा पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात अनेक चुका झाल्या आहेत. कधी छपाईतल्या चुका होत्या तर कधी उल्लेख चुकीका केला होता. तेव्हा सुद्धा असेच मुद्दे उपस्थितीत करून आक्षेप घेतला होता. आणि आता आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील ही घोडचूक समोर आली आहे. यामुळेचे यासंबंधित लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!