सेवा वर्तवणूक नियम उल्लंघन; ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे निलंबित
भुसावळ (प्रतिनिधी)। तालुक्यातील ग्रामपंचायत साकेगाव येथील गौतम आधार वाडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत साकेगाव येथे कार्यरत असतांना त्यांनी ग्रामपंचायत कराच्या रकमा वसूल करून ग्रामपंचायतीच्या खात्यात भरणा करणे आवश्यक असतांना त्यांनी सदर वसूल रक्कम परस्पर खर्च करून आर्थिक अनियमितता केली असलेचे प्रथम दर्शनी निर्दशनास आल्याने वाडे यांनी महाराष्ट्र जिल्ह्या परिषद जिल्ह्या सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम ३ चे तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आले आहे.त्या नुसार गौतम वाडे ग्रामविकास अधिकारी हे महाराष्ट्र जिल्ह्या परिषद जिल्ह्या सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ व ४ नुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरल्याने ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे निलंबित करण्यात आले आहे.तर सरपंच यांचे कारवाईसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करणार येणार आहे.
उपरोक्त आरोपाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्या परिषद जळगांव प्रदानिक अधिकारानुसार गौतम आधार वाडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत साकेगाव तालुका भुसावळ यांना सदर आदेश निर्गमित दिनांका जिल्ह्या परिषद जळगावचे सेवेतून निलंबित केल्याचे आदेशात करण्यात आले आहे.वाडे कडील ग्रामपंचायत साकेगाव तालुका भुसावळ येथील कार्यभार हा गटविकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ हे तात्पुरत्या स्वरूपात इतर ग्राविअ यांच्याकडे सुपूर्त करण्याचे कारवाई करतील.
गौतम आधार वाडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत साकेगाव तालुका भुसावळ यांचे निलंबन कालावधीत पंचायत समिती एरंडोल हे मुख्यालय देण्यात आलेले आहे.तसेच निलंबित कालावधी गौतम आधार वाडे ग्रामविकास अधिकारी यांचा निर्वाह भत्ता महाराष्ट्र नागरी सेवा (पद्ग्रहन अवधी,स्वीयेत्तर सेवा,निलंबन कालावधी प्रदाने) नियम १९८१ मधील ६८ नुसार अनुज्ञयेय राहील.निलंबन कालावधीत निर्वाह भत्ता गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांचे स्तरावरून नियमानुसार अदा करण्यात येईल असे आदेश डॉ.बी.एन.पाटील (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्या परिषद जळगांव यांनी जाक्र /ग्रापं/आस्था ३/आरआर/४९३/२०२० ग्रामपंचायत विभाग जिल्ह्या परिषद जळगांव दिनांक २/१२/२०२० रोजी निलंबन आदेश काढून गट विकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ यांना कळविले आहे.