भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

सोशल डिस्टन्सची ऐसी की तैसी; मनवेल येथील आठवडे बाजारात मोठी गर्दी, शासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष !

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील मनवेल गांवात दर शनिवारी आठवडे बाजार भरतो असतो गेल्या आठ दिवसापासून गांवात कोरोना विषाणूने मोठा हाहा:कार माजविला असला तरी गांवात आज मोठ्या उत्साहात आणि मोठ्या गर्दीत आणि आत्मविश्वासाने आठवडे बाजार संध्याकाळी 5 वाजता भरणार आहे. यात सोशल डिस्टन्सची ग्रामस्थांकडून ऐसी की तैसी होत असून यामुळे मनवेल  ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावां बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कारण मनवेल  गांवात दिनांक २४ जुलै 2020 रविवार रोजी संध्याकाळी कोरोना पॉझिटिव्ह एकूण १ रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर मनवेल  गांवातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६ झाली आहे. त्यामुळे मनवेल  ग्रामस्थांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आरोग्य विभागाने, महसूल व पोलिस प्रशासनासह गांवातील प्रमुख समाजसेवकांनी ठोस निर्णय घेऊन कडक कारवाई करून मनवेल गांवात भरणारा आठवडे बाजार बंद ठेवायला पाहिजे होता असे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. शनिवार रोजी भरणाऱ्या आठवडे बाजारात धानोरा, यावल , किनगांव, साकळी, येथील व्यापारी येत असतात. ग्रामपंचायत मार्फत आठवडे बाजार बंद आहे असे जाहीर आवाहान करायला पाहिजे. मनवेल गांवात चार रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे तर दोन उपचार घेत आहे तरी सुद्धा गांवात आठवडे बाजारात  मोठी गर्दी होत आहे याकडे आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन व महसुल विभागाकडुन मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थामध्ये बोलले जात आहे.   

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!