स्वाभिमानी’ची बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक! लॉकडाउन काळातील संपूर्ण वीजबिल माफ करा..अन्यथा सरकारशी “असहकार” आंदोलन – रविकांत तुपकर
बुलडाणा (विष्णू आखरे पाटील)। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत.नागरिक घरात असल्याने सर्वांची रोजी रोटी बंद आहे.त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे यासाठी 10 ऑगस्ट रोजी माजी खासदार राजू शेट्टी व चळवळीतील जेष्ठ नेते .एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले होते.त्याअनुषंगाने बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकारी षण्मुखाराजन एस.यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
राज्यसरकारने तात्काळ वीज बिले माफ करावी अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेवून सरकारशी असहकार आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच विज कंपन्यांकडून नागरीकांना अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत.त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे,ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत. वीज कंपन्यांनी वीज बिले भरण्यासाठी तगादा लावल्याने आत्महत्या झाल्याचे घटनाही घडत आहेत.त्यामुळे सरकारने 300 युनिट पर्यंतच्या ग्राहकांची विजबिले तात्काळ माफ करावे या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी ‘स्वाभिमानी’चे राणा चंदन,पवन देशमुख,शे.रफिक शे.करीम,दत्तात्रय जेऊघाले,असिफ सेठ,दिलीप निकम,गणेश इंगोले, निलेश राजपूत,गोपाल जोशी,शेख युनूस,पवन नप्ते,लवेश उबरहंडे याच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..