भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावयावल

हतनुर धरण पाटाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून कोळसा निर्मिती, किनगाव येथील कर्मचाऱ्याचे कृत्य

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

यावल दि.9(सुरेश पाटील) हतनूर धरणाचा पाट यावल रावेर तालुक्यातून गेलेला आहे या पाटाच्या आजूबाजूस असलेले बाभळीचे झाड आणि इतर वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्याचा सपाटा लाकूडतोडणाऱ्यानी सुरु केला असून यात किनगाव येथील एक कर्मचारी सहभागी असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे तरी हतनुर विभाग उपविभागीय अभियंता एस.एस.चौधरी यांनी वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे.

हतनूर धरणाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडासह इतर वृक्ष मोठमोठे झालेली आहेत ही वृक्षतोड किनगाव येथील एक कर्मचारी करीत असून लाकूड तोडणारे हे लाकूड चेरी फॅक्टरीत व इतर व्यवसायिकांना विक्री करून मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहे काहीजण बाभळीची झाड तोडून त्याचा कोळसा पाडून कोळसा विक्रीचा व्यवसाय सुद्धा करीत आहेत.हतनुर उपविभाग यावल उपविभागीय अभियंता एस.एस.चौधरी वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध तसेच त्या किनगाव येथील कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यातून बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!