हिंगोण्यामध्ये २ व किंनगाव १ अहवाल कोरोना बाधित !
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील कोरोना तपासणी अहवाल यावल सेंटर ला आज सकाळी प्राप्त झाले अहवालानुसार हिंगोणा येथे २ तर किंनगावं येथे १ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे
तालुक्यातील आज आलेल्या अहवालांमध्ये हिंगोणा येथील एक ४८ वर्षीय महिला व एक २० वर्षीय पुरुष मुलास कोरोनाची बाधा झाली असून सदरील दोघे एकाच परिवारातील आहेत तर या आधी यांच्या परिवारातील व्यक्ती बाधित आढळून आले असून मस्जिद परिसर गाजरे वाडा येथील रहिवासी आहे, सदरील परिसर आधिच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. गावकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असून चिंता पुन्हा वाढली आहे. तसेच किंनगाव येथील २२ वर्षीय पुरुष व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. किंनगावमध्येही बाधित संख्या वाढत आहे त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास तालुका प्रशासन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन दुजोरा मिळाला आहे.
मंडे टू मंडे कडुन आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.