हिंगोणा येथे स्वस्त धान्य दुकानवर महीला रेशनिग कमेटीचा जिल्हा सदस्या चंद्रकला इंगळे यांची भेट.
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। येथील गावात वि.वि. कार्य. सोसायटी मधील स्वस्त धान्य दुकानवर महीला जिल्हा रेशनिंग कमेटीच्या सदस्या चंद्रकला इंगळे यांनी भेट देऊन लाभार्थीच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संपूर्ण जगात कोराना माहमारीचा प्रभाव वाढत असल्यामुळे केंद शासनाने गोरगरीबांना मोफत तांदुळ वाटप तीन महिन्यांण करीता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यात काही रेशनिंग दुकांनंदार काळाबाजार करीत असल्याचा उघळ होत आहे.
याकरीता जिल्हा स्तरीय रेशनिंग कमेटी नेमण्यात आली असून त्याची संपूर्ण जिल्हा भर भेट सुरू आहे. तसेच यावल तालुक्यात आमदार शिरीष चौधरी, संदीप भैया पाटील, जि.प. गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे व जिल्हा रेशनिंगचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रेशनिंग सदस्या चंद्रकला इंगळे ह्या तालुक्यात रेशनिंग दुकानावर भेट देऊन स्वतः आपल्या हाताने लाभार्थ्यांना रेशनिंग वाटप करीत आहे. व आज त्यांनी हिंगोणा येथे भेट देऊन लाभार्थांनां रेशन धान्य वाटप केले व रेशनिंग दुकानंदारांना सुचना दिल्या की एक पण लाभार्थी तांदुळापासुन वंचित राहिला नको. अशी कोणतीही तक्रार आल्यास रेशनिंग परवाना रद्द करण्यास येईल असे सागितले.