महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ भागात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाची शक्यता, गुजरातकडे जाणाऱ्या ६७ रेल्वेगाड्या ही रद्द

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बिपरजॉय चक्रिवादळाबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉयच्या प्रभामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून ७५०० लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील या भागात पावसाची शक्यता
पुढील २-३ दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील २ ते ३ दिवस मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे . हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नशिक,रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, १५ जून रोजी चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!