‘२० वर्षांपर्यंत राहू शकतो हा जीवघेणा कोरोना…’ – चीनच्या तज्ज्ञांचे मत
कोरोना विषाणू -२० अंश सेल्सिअस तापमानात २० वर्षे जगू शकतो.
चीनचे रोग विशेषतज्ज्ञ ली लांजुआन म्हणाले होते की, कोरोना विषाणू -२० अंश सेल्सिअस तापमानात २० वर्षे जगू शकतो. तर – ४ अंश सेल्सिअस तापमानात कित्येक महिन्यांकरिता तो राहू शकतो. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चायना न्यूज सर्व्हिसच्या माहितीनुसार, प्रकाशित केलेल्या अहवालात असे सांगितले की, ली लांजुआनला यांनी केलेल्या अभ्यासानुसार, विशेषतः कोरोनाचा विषाणू हा शीत प्रतिरोधक (cold resistant) आहे. पण जेव्हा हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि तो व्हायरल झाला, तेव्हा लांजुआ यांनी केलेले आपले विधान बदलले.
ग्लोबल टाईम्सने आपल्या अहवालात लिहिले की, ली लांजुआन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस अधिक काळ हा थंड वातावरणात राहू शकतो. यामुळे हा विषाणू अधिक काळ जीवंत राहत असल्याने तो एका देशातून दुसर्या देशात पोहोचत आहे. बर्याच वस्तू एका देशातून दुसर्या देशात पाठविल्या जात असताना केवळ थंड तापमान असेल अशा स्थितीत ती पाठवली जाते. तसेच असेही म्हटले जात आहे की, हा व्हायरस शीत प्रतिरोधक (cold resistant) असल्याने, कोरोना व्हायरस चीनच्या सी फूड मार्केटमध्ये बर्याचदा आढळून आला होता.
चिनी वृत्तपत्राने देखील उद्योगातील लोकांचा म्हणण्यानुसार असेही सांगितले की, रोग विशेषतज्ज्ञांच्या वक्तव्यानंतर चिनी लोक हे गोठवलेल्या अन्न पदार्थां (फ्रोजेन फूड) पासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. शुक्रवारी चीनमधील भूमिगत सी फूड मार्केटमधून २०० नमुने घेण्यात आले. यातील बरेच नमुने पॉझिटिव्ह आले. यापूर्वी, असेही अहवाल प्रसिद्ध झाले की, चीनच्या झीनफडीमध्ये आयात केलेल्या Salmonच्या चोपिंग बोर्डमध्ये विषाणू सापडले आहे. यानंतर Salmon च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.
हा अहवाल चीनच्या प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर रोग विशेषतज्ज्ञ ली लांजुआन यांनी दावा केला की, त्यांचे वक्तव्यात आदला-बदल करून ते प्रसिद्ध केले गेले. याविषयी बोलतावा ते लांजुआन म्हणाले- “कोरोना व्हायरस हा एक नवीन विषाणू आहे आणि त्याचा थंडीपासून प्रतिरोध अद्याप आढळला नाही.”
ली लंझुआन यांचे विधान चीनच्या सोशल मीडियावरही व्हायरल झाले आणि लोकांनी गोठवलेल्या अन्न पदार्थांपासून स्वत: ला दूर ठेवले. शनिवारी चीनच्या न्यूज पोर्टल zjol.com.cn शी बोलताना लांजुआन यांनी दावा केला की, त्यांच्या वक्तव्याचा गैरसमज झाला आहे. ते म्हणाले की, बरेच दिवस अतिशीत तापमानात व्हायरस सक्रिय राहू शकतो आणि तो व्हायरस कोरोना नसून आधीच ज्ञात असेलेल्या विषाणूसाठी होते, असे त्यांनी सांगितले.
ली म्हणाले की, कोरोना विषाणूच्या शीत प्रतिकार विषयी अजून अभ्यास करायचा आहे, असे त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दरम्यान, ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच बीजिंगमध्ये कोरोनाची नोंद केलेल्या रुग्णांचा संबंध हा आयात केलेल्या फ्रोजन फूडशी असल्याचे आढळले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा