भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

५ लाखांचा गुटखा हस्तगत; गुटका माफियांमध्ये खळबळ !

अमळनेर (प्रतिनिधी)।  येथील शनी पेठ मंगळनगर येथील रहिवासी गोकुळ पाटील यांच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून गुटख्याचे गबाळ शोधून ५ लाख १५ हजार १२० रुपयांचा गुटखा जप्त केल्याने गुटका माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १० ऑक्टोबर च्या मध्यरात्रीच्या सुमारास शनीपेठ मंगळनगरातील गोकूळ पाटील याच्या घरावर छापा टाकला असता गुटख्याचे गबाळ हाती लागले असून यात विमल २ पोते, सागर १० पोते, मिराजचे ४ बाँक्स गुटखा असे तब्बल बाजारभावानुसार ५ लाख १५ हजार रुपये किंमतीचे मोठे गबाळ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गु र नं ५८४/२०२०,भादवि कलम 272,273,328 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!