१ कोटी २२ लाख खंडणी व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे षडयंत्र प्रकरण : सीबीआय पथक जळगाव मध्ये दाखल
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सूरज झँवर यांचेकडून १ कोटी २२ लाखांची खंडणी स्वीकारली होती. निलेश भोईटे सह इतरांना अटकवण्याचे षडयंत्र रचून बीएचआर प्रकरणात तुझ्या वडिलांना बाहेर येऊ देणार नाही. सुरेशदादांना ज्याप्रकारे पाच वर्षे मध्ये ठेवलं तसं तुझ्या वडिलांना देखील आत ठेवेल, अशी धमकी देत सूरज झंवर यांचेकडून खंडणी उकळली होती. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशन व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. हे दाखल गुन्हे माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित आहेत. या गून्ह्यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे दोन अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दि. १६ रोजी जळगावात दाखल झाले आहे.
सीबीआयच्या पथकामध्ये पथकामध्ये अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या पथकाकडून चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.
माझी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात कट रचून खोट्या गुन्ह्यात निलेश भोईटेसह इतरांना अटकवण्याचे षडयंत्र रचल्याचाही गुन्हा दाखल आहे. सीबीआयच्या पथकामध्ये अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तसेच या पथकाने दोघं गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींना चौकशीसह जाब- जबाब साठी बोलविले आहे. त्यांनी आज काही जणांची चौकशी केल्याचे समजते. आठवडाभर हे पथक जळगाव मध्ये थांबणार आहे.
खंडणी प्रकरणी सूरज झंवर यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. उदय पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी झँवर यांचेकडून १ कोटी २२ लाखांची खंडणी स्वीकारली होती. बीएचआर प्रकरणात तुझ्या वडिलांना बाहेर येऊ देणार नाही. सुरेशदादांना ज्याप्रकारे पाच वर्षे मध्ये ठेवलं तसं तुझ्या वडिलांना देखील आत ठेवेल, अशी धमकी देत सूरज झंवर यांचेकडून खंडणी उकळली होती. सदर गुन्हा सीबीआयकडे वर्ग झालेला आहे. त्याचा तपास सुरू आहे