बनावट शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीच्या जाळ्यात ओढून १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बनावट शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीच्या जाळ्यात ओढून १.३२ कोटी रुपयांची एका व्यक्तीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात उघडकीस आली.
सोशल मीडियावर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या शेअर ट्रेडिंगच्या जाहिराती दाखवण्यात आल्या. या जाहिरातींना भुलून एका व्यक्तीने जाहिरातदारांशी संपर्क साधला आणि गुन्हेगारांनी त्यांना बनावट कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही रक्कम परत मिळाल्याने सदर व्यक्तीचा विश्वास बळावला आणि त्यांनी मोठी रक्कम गुंतवली. मात्र, नंतर गुन्हेगारांनी संपर्क तुटवला आणि पैसे गुंतवणारी व्यक्ती मोठ्या रकमेला मुकले.
फसवणूक झालेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. सुरुवातीला त्यांना काही रक्कम नफा म्हणून परत मिळाला, ज्यामुळे त्यांचा विश्वास बळावला आणि त्यांनी अधिक पैसे गुंतवले. मात्र, कालांतराने गुन्हेगार व्यक्तीशी संपर्क तुटवला आणि सदर व्यक्तीच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे.
गुन्हेगारांना दिलेल्या बँक खात्यात जमा केलेल्या पैशांची एकूण रक्कम १.३२ कोटी रुपये आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने तक्रार दिल्याने सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे पथक तपास करीत आहे. गुन्हेगारांनी वापरलेल्या बँक खात्यांचा तपास, मोबाइल लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींचा वापर करून पोलीस गुन्हेगारांच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.