रावेर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी १० इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर-यावल विधानसभेतुन निवडणुक लढवण्यासाठी पहिल्याच दिवशी दहा इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकऱ्यांनी दिली.
विधानसभा निवडणूक अर्ज प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी निवडणूक लढविण्यासाठी रावेर शहराचे माजी नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, धनंजय शिरीष चौधरी, फैजपुर येथिल शेख कुर्बान शेख करीम, रावेर येथील डी डी वाणी, नुर मोहोम्मद तडवी, प्रशांत बोरकर,रावेर. रशिद तडवी कुसुंबा, संजय चौधरी .रसलपुर, परसाळे,ता. यावल येथिल सकीला महेमूर तडवी या दहा इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज आज खरेदी केले असून मोठी चुरशीची निवडणूक होणार हे मात्र नक्की.