भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

ब्रेकिंग : वक्फ बोर्डाला १० कोटी निधी, २४ तासात निर्णय रद्

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २८ नोव्हेंबर रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी देण्याबाबतचा जी आर काढण्यात आला होता. हा निर्णय महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अवघ्या २४ तासात हा निर्णय रद्द करण्यात आला असल्याची अपडेट समोर आली आहे.

राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला १० कोटींचा निधी दिल्याचा जीआर काढण्यात आला होता. प्रशासनाने काढलेला हा जीआर योग्य नसून त्याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महायुतीच्या काळजीवाहू सरकारकडून २८ नोव्हेंबर रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगली होती.

या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीट केले होते. सध्या राज्यामध्ये काळजीवाहू सरकार आहे या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय घेतात येतात. या निर्णयही प्रशासन पातळीवरुन घेतला असल्याचे असे दिसत आहे, असं त्यांनी म्हटले होते.

अशातच आता २४ तासंमध्येच हा मोठा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक होती, अशी माहिती मुख्य सचिव सुजिता सौनिक यांनी दिली आहे. राज्यामध्ये काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा आदेश परस्पर काढता येत नाही, असंही स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही, प्रशासकीय पातळीवर वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका होताच राज्य सरकारवर हा जीआर मागे घेण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची माहिती आता समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!