सावदा केंद्राचा विज्ञान शाखेचा १००% तर कला शाखेचा ७३% निकाल, निकालात मुलीची बाजी …!!
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपालिका संचालित श्री आ. गं. विद्यालय व ना गो पाटील कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा सन २०२५ निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला त्यात विज्ञान शाखेत १२६ प्रतिष्ठित होते होते त्यापैकी १२६ पास झाल्याने शंभर टक्के विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के निकाल लागला असून त्यात कुमारी अनुष्का रमाकांत कोष्टी हिस ५०७ गुण मिळवू ८४;५० टक्के मिळविल्याने पहिला क्रमांक पटकाविला असून सापकर पूर्वा दीपक हिस ५०२ गुण मिळवून ८८;६७ टक्के मिळाल्याने दुसरा क्रमांक मिळविला आहे.
कला शाखेत ८७ विध्यार्थी प्रतिष्ठित होते यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या शाखेचा निकाल ८८;७३टक्के लागला आहे यात वाघ साक्षी अनिल ही ४१४ गुण मिळवुन ६९ टक्के गुण मिळाल्याने कला शाखेत प्रथम क्रमांक मिळावा आहे.तर चंडाले सिमरन विजय हिस ४१२ गुण मिळविल्याने ६८; ६७ टक्के मिळाल्याने दुसरा क्रमांक चे मानकरी झाले आहे. सर्व शाखेमध्ये मुलींनी सालाबादप्रमाणे बाजी मारली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सावदा न.पा.प्रशासक तथा प्रांतअधिकारी मा. श्री. बबनराव काकडेसाहेब, मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा, गट शिक्षणाधिकारी रावेर विलास कोळी. सर्व माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी गटनेते, माजी नगरसेवक, मुख्याध्यापक श्री. प्रकाश गणू भालेराव, पर्यवेक्षक श्री. वाय.एन. पाटील, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.