दहावीची परीक्षा आणखी झाली सोपी; ३५ नव्हे ‘इतके’ गुण जरी मिळाले तरी पास व्हाल!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावीच्या परीक्षेत मोठा बदल झाला असून आता विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयात ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्याना अकरावीत प्रवेश मिळणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आलीय.
गणित आणि विज्ञान विषय म्हटले की, अनेकांना घाम फुटतो. मात्र, या दोन्ही विषयात कमजोर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने मोठा बदल केला आहे. बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३५ गुण आवश्यक असतात. मात्र, यापुढे विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञानात २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्याला उत्तीर्ण केले जाणार आहे. पंरतु, संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील.