११ लाखांचा गांजा चा साठा जप्त
चोपडा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l आज शनिवार दि. २७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनने जप्त केला आहे. दुचाकीसह सायसिंग बरकत बारेला.रा.विष्णापुर. ता.चोपडा. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
चोपडा येथून जवळील विष्णापूर येथील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडच्या घरात अवैध गांजाची साठवणूक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ.कुणाल सोनवणे, पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे स.पो.नि. संतोष चव्हाण, पो.उ.नि. राजु थोरात, पो.हे.काॅ. भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतिष भोई, भूषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने शनिवार दि. २७ रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त करून ६ हजार रुपये किंमतीचा ईलेक्ट्राँनिक वजन काटा, एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करून सायसिंग बरकत बारेला. वय ३६ वर्ष, रा. विष्णापूर ता.चोपडा. याला अटक करण्यात आली आहे.